Posts

Showing posts from May, 2019

कामगार वर्गाच्या एकजुटीसाठीच्या संघर्षाची ५० वर्षे

Image
वर्गीय एकजूट वर्ग संघर्ष शोषण समाप्त करण्यासाठी , समाज परिवर्तनासाठी , वर्ग संघर्ष ही दृष्टी घेऊन १९७० मध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयु) ची स्थापना झाली. या वर्षी ३० मे या सिटूच्या स्थापना दिवशी, सिटूची सुवर्ण जयंती साजरी करण्याच्या वर्षभराच्या उत्सवाची सुरवात होत आहे. ही दृष्टी सिटूच्या घटनेमध्ये अशी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे : ‘ सिटू मानते की कामगार वर्गाच्या शोषणाचा अंत फक्त सर्व उत्पादनाच्या, वाटपाच्या आणि देवाणघेवाणीच्या साधनांचे सामाजीकरण करून आणि समाजवादी राज्य स्थापित करूनच केला जाऊ शकतो. समाजवादाच्या आदर्शांना वेगाने आपलेसे करून समाजाच्या शोषणापासून पूर्ण मुक्तीच्या आपल्या ध्येयासाठी सिटू खंबीरपणे उभी राहू शकते. ’ पुढे जाऊन , ‘ वर्ग संघर्षाशिवाय कोणतेही परिवर्तन घडवून आणले जाऊ शकत नाही या भूमिकेवर सिटूचा ठाम विश्वास असून कामगार वर्गाला वर्ग समन्वयाच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या प्रयत्नांना सिटू सातत्याने परास्त करेल. ’ ही दृष्टी काळाच्या परिक्षांमध्ये खरी उतरली आहे. पन्नास वर्षांच्या अनुभवाने आपली घटनात्मक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठीची

लढा आणि त्यागाची १०० वर्षे

Image
Centre of Indian Trade Unions भारताच्या कामगार वर्गाच्या “ लढा आणि त्यागाची १०० वर्षे ” जे. एस. मुजुमदार सिटू, पहिल्या कामगार संघटना केंद्राच्या स्थापनेपासूनची, भारताच्या कामगार वर्गाच्या “ लढा आणि त्यागाची १०० वर्षे ” आणि सीआयटीयुच्या स्थापनेपासूनची “ कामगार वर्गाच्या एकजुटीसाठीच्या संघर्षाची ५० वर्षे ” साजरी करण्याच्या वर्षभराच्या कार्यक्रमाची सुरवात ३० मे २०१९ रोजी करत आहे. वर्गीय आणि लोकहितासाठी, वर्गीय एकजुटीसाठी आणि वर्गीय दृष्टीकोन व अभिमुखता विकसित करण्यासाठी झालेल्या सीआयटीयुच्या स्थापनेपर्यंतचे कामगार वर्गाच्या लढा आणि त्यागाचे मैलाचे दगड आपण खाली नमूद करीत आहोत. या लढ्यांमधूनच मिळालेल्या शिकवणीतूनच सिटूच् या “ एकजूट आणि लढा ” या घोषणेची निर्मिती झाली. कामगार वर्गाच्या या लढा आणि त्यागाचा वारसा घेऊन सिटूने पुढे कशी वाटचाल केली आणि नवीन ऐतिहासिक मैलाचे दगड कसे निर्माण केले हे आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत. भारतातील पहिल्या कामगार संघटना केंद्राच्या उदयामागे कामगार वर्गाच्या लढा आणि त्यागाची स्वत : ची अशी पार्श्वभूमी आहे. वर्ग संघर्ष हा भांडवली उत्पादन व्