Posts

Showing posts from September, 2018

८ आणि ९ जानेवारी २०१९ - दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संप

Image
८ आणि ९ जानेवारी २०१९ - दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संप २८ सप्टेंबर २०१८ रोजी मावलंकर सभागृह, नवी दिल्ली येथे झालेल्या कामगारांच्या राष्ट्रीय संमेलनाची हाक घोषणापत्र ८ ऑगस्ट २०१७ रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कामगारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे निर्णय केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र फेडरेशन्स आणि संघटना पुढच्या टप्प्यात घेऊन गेल्या आहेत. ३ महिन्यांच्या देशव्यापी व्यापक व सखोल मोहिमेनंतरच्या ९, १० व ११ नोव्हेंबर २०१७ च्या महापडावाचे यशस्वी आयोजन हा सरकारकडून कष्टकरी जनता आणि त्यांच्या कामगार संघटनांवर होणारे हल्ले, कामगारांनी मोठ्या कष्टाने लढून मिळवलेल्या कामगार अधिकारांवरील हल्ले, कामगार कायद्यांचे कामगार विरोधी व मालक धार्जिणे संहितीकरण आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांचे तसेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या सनदींचे उल्लंघन ह्या सर्वांचा प्रतिरोध करण्यासाठी केलेल्या लढ्यातील एक मैलाचा दगड होता. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखणे, नवीन सन्माननीय रोजगाराची निर्मिती, कमीत कमी १८००० रुपये किमान वेतन आणि सर्वांना किमान ६००० रुपये पेन्शन, सार्वजनिक उद्योगांच्