Posts

Showing posts from February, 2019

कामगारांच्या मागण्यांची सनद

Image
५ मार्च २०१९ रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब, नवी दिल्ली येथील कामगारांच्या राष्ट्रीय संमेलनात पारित केलेली कामगारांच्या मागण्यांची सनद प्रिय कामगार भावांनो आणि बहिणींनो, आपण कामगार, शेतकरी आणि इतर कष्टकऱ्यांच्या बरोबर देशाच्या संपत्तीची निर्मिती करतो. ते आपण आहोत, जे देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी योगदान करतो. तरी सुद्धा आपले ज्वलंत प्रश्न, आपल्या गंभीर समस्या, आपल्या तातडीच्या मागण्या यांच्याकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त कामगार चळवळीने वारंवार कामगारांचे महत्वाचे प्रश्न उचलले. आपण अनेक साधनांद्वारे आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करवून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला, ज्यात अलिकडचा सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे दोन दिवसांचा देशव्यापी सार्वत्रिक संप, ज्याला कष्टकऱ्यांच्या सर्व विभागांचा प्रचंड पाठिंबा मिळाला, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. आज देश खूप तीव्र संकटात आहे. आपल्याप्रमाणेच शेतकरी, शेतमजूर आणि इतर कष्टकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाच्या सर्व पैलूंना संकटांनी घेरले आहे. मोठ्या कष