Posts

Showing posts from December, 2018

रोजगार निर्मिती

Image
रोजगार निर्मिती ८,९ जानेवारी २०१९च्या सार्वत्रिक संपाचा मुख्य मुद्दा हेमलता - अध्यक्ष, सिटू   ‘ माझा रोजगार कुठे आहे ?’ हा प्रश्न आज संपूर्ण देशातील लाखो युवक युवतींच्या मनाला भेडसावतो आहे. २०१४ मध्ये युवकांना आकर्षित करून घेण्यासाठी, त्यांची मते मिळविण्यासाठी निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी एका आश्वासनावर ते सरकारकडून ठोस उत्तर मागत आहेत. पण मोदी सरकार मात्र बहिरे असल्याचे नाटक करत आहे.   आज जेव्हा भाजप सरकार आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे तेव्हा रोजगाराची नेमकी स्थिती काय आहे ? २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकींआधी भाजपने वचन दिले होते की त्यांना सत्ता मिळवण्याइतकी मते मिळाली तर ते दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करतील. सत्तेमध्ये स्थानापन्न झाल्यावर मोदी सरकारने ‘ मेक इन इंडिया ’, ‘ स्किल् इंडिया ’, ‘ स्टार्ट अप इंडिया ’, ‘ डिजिटल इंडिया ’ प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (पीएमआरपीवाय) अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरवात करून असा भ्रम निर्माण केला की यातून रोजगार निर्मिती होणार आहे. नोकरीसाठी भटकंती आणि गुणवत्तापूर्ण नोकऱ्या नदारद ह्या य