Posts

Showing posts from August, 2018

स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘सामूहिक जागरण’

Image
मजदूर-किसान संघर्ष रॅली सीआयटीयु-अखिल भारतीय किसान सभा-अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ – चलो लोकसभा १४ ऑगस्ट २०१८ - स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘ सामूहिक जागरण ’ आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून आता सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपण भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिशांशी शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत निकराचा लढा दिला. तो कुणा व्यक्ती किंवा पक्षाने एकट्याने दिलेला लढा नव्हता. ह्या लढ्यामध्ये अनेक ठिकाणी देशातील कष्टकरी जनता, कामगार वर्ग, शेतकरी, आदिवासी हे सर्व आघाडीवर होते. आर्थिक शोषण आणि सरंजामी दमन याच्या विरोधात लढत असतानाच त्यांनी असे शोषण आणि दमन लादणाऱ्या वसाहतवादी सत्तेविरोधात देखील लढा दिला. आपले वाडवडील जेव्हा अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध लढत होते, तेव्हा देशाच्या, आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडा, पंतवंडांच्या भवितव्याबद्दल त्यांनी काही स्वप्ने उराशी बाळगली होती. शेकडो, हजारो कामगार, युवा, विद्यार्थी, महिला, जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी सर्वस्वाचा त्या

भाववाढीला रोखण्यासाठी - ५ सप्टेंबर - चलो दिल्ली - मजदूर-किसान संघर्ष रॅली

Image
संघटित व्हा ! संघर्ष करा ! ०.१ % लोकांच्या सरकारला नाकारण्यासाठी, ९९.९ % लोकांच्या हिताच्या धोरणांसाठी मजदूर-किसान संघर्ष रॅली सिटू - अखिल भारतीय किसान सभा - अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ - चलो लोकसभा   भाववाढ मोदी सरकार अशी बढाई करीत आहे कि गेल्या चार वर्षात भाववाढ कमी होऊन नगण्य झाली आहे. हे सिद्ध करण्यासाठी अधिकृत घाऊक निर्देशांकाची आकडेवारी सांगितली जाते. परंतु सरकारच्या इतर दाव्यांप्रमाणे हा पण फोल आहे. कष्टकरी जनतेला स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किती   ओढाताण करावी लागते हे स्वतःच्या अनुभवातून कळते. अधिकृत ग्राहक निर्देशांकानुसार ग्रामीण भागातल्या किंमती   मे २०१४ (म्हणजे हे सरकार स्थापन झाले तेंव्हा) आणि एप्रिल २०१८ च्या दरम्यान २१%ने वाढल्या. शहरी भागात ही वाढ १७% आहे. सरकारने दरवाढ नियंत्रित केली आहे या दाव्याबद्दल रिझर्व बँक देखील साशंक आहे. आपण जरी अधिकृत निर्देशांक गृहित धरले तरी ह्या आकड्यांवरून फारफारतर एका विशिष्ट कालावधीत सरासरी दर कसे बदलले हे लक्षात येते. परंतु विशिष्ट वस्तूंचे दर गेल्या चार वर्षात वेळोवेळी प्रचंड वाढल्याचे

सफाई कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या व प्रतिष्ठित जीवनाच्या मागणीसाठी - ५ सप्टेंबर - चलो दिल्ली - मजदूर-किसान संघर्ष रॅली

Image
संघटित व्हा ! संघर्ष करा ! ०.१ % लोकांच्या सरकारला नाकारण्यासाठी, ९९.९ % लोकांच्या हिताच्या धोरणांसाठी मजदूर-किसान संघर्ष रॅली सिटू - अखिल भारतीय किसान सभा - अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ - चलो लोकसभा   सफाई कर्मचाऱ्यांसाठी चांगले व प्रतिष्ठित जीवन जवळ जवळ सर्व सफाई कर्मचारी दलित समुदायामधून येतात, कदाचित थोडे फार कर्मचारी इतर मागासवर्गीय समाजाचे देखील असू शकतात. त्यातील बहुतेक महिला आहेत. ते सर्व गरीब कुटुंबांमधून येतात. म्हणूनच ते समाजातील सर्वाधिक आर्थिक शोषणाला आणि सामाजिक दमनाला बळी पडणारे समाज घटक आहेत. मानवी आणि जनावरांची विष्ठा, कुजलेले मांस व अन्न आणि रस्त्यावर फेकलेला सर्व कचरा हटवून स्वच्छता करणे, तुंबलेली गटारे मोकळी करून स्वच्छ करणे, जी बहुधा मानवी विष्ठेनी भरलेली असतात, ही सर्व कामे त्यांच्याकडून करवून घेतली जातात. एकदा पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री असताना जसे म्हणाले होते तसे, त्यातून त्यांना काही ‘ अध्यात्मिक अनुभव ’ मिळतो म्हणून ते हे काम करत नाहीत. मोदी म्हणाले होते की ते असे मानत नाहीत की “ सफाई कर्मचारी फक्त त्यांची उपजीवि