Posts

Showing posts from April, 2019

मे दिनाचा जाहीरनामा, २०१९

Image
CENTRE OF INDIAN TRADE UNIONS भारतीय ट्रेड युनियन केंद्र मे दिनाचा जाहीरनामा , २०१९ ह्या मे दिनी , कामगारांच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या दिवशी , सिटू जगभरातील कष्टकरी जनतेला भातृभावी अभिवादन करीत आहे. नवउदारवादाच्या , विशेषतः गेल्या एक दशकानंतरही सुरूच असलेल्या , भांडवलशाहीच्या व्यवस्थागत जागतिक संकटानंतर वाढत गेलेल्या तीव्र हल्ल्यांपासून कामगार वर्गाने मोठ्या कष्टाने मिळवलेले अधिकार वाचविण्यासाठीच्या लढ्याशी एकजूट दर्शवत आहे. ह्या मे दिनी , सिटू साम्राज्यवादाच्या नेतृत्वाखाली वेनेनझुएला , सीरिया , पॅलेस्टाईन , इराक , येमेन , अफगाणिस्तान आणि अन्य देशांमध्ये होणारे हस्तक्षेप , दगाबाजीची कारस्थाने , हल्ले आणि युद्ध आदी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. अमेरिकन साम्राज्यवादी कारस्थानांच्या विरोधात लढणार्‍या त्या देशांमधील जनतेला आणि सर्व पुरोगामी शक्तींना आपला पाठिंबा जाहीर करीत आहे. अमेरिकन साम्राज्यवादाच्या उघड उघड पाठिंब्याच्या जोरावर पॅलेस्तिनी भागांवर कब्जा करण्याच्या इझ्राईलच्या प्रयत्नांचा धिक्कार करीत , १९६७ सालच्या सीमा आणि पूर्व जेरुसलेम