मध्यान्न भोजन कार्यक्रम बळकट करा -५ सप्टेंबर - चलो दिल्ली - मजदूर-किसान संघर्ष रॅली
संघटित व्हा! संघर्ष करा! ०.१% लोकांच्या सरकारला नाकारण्यासाठी, ९९.९% लोकांच्या हिताच्या धोरणांसाठी मजदूर-किसान संघर्ष रॅली सिटू - अखिल भारतीय किसान सभा - अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ - चलो लोकसभा मध्यान्न भोजन कार्यक्रम बळकट करा! शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या! किमान वेतन! सामाजिक सुरक्षा! खाजगीकरण करू नका! सरकारी क्षेत्रातील शिक्षणावरील खर्चात वाढ करा! १५ ऑगस्ट १९९५ रोजी भारत सरकारने मध्यान्न भोजन कार्यक्रमाची सुरवात केली. सुरवातीला देशातील २४०८ तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ह्या कार्यक्रमाचा विस्तार १९९७-९८ मध्ये सर्व तालुक्यांमध्ये करण्यात आला. ह्याचा टप्प्या, टप्प्याने विस्तार करून तो सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अधिक व्यापक समुदायाला लागू करण्यात आला. मध्यान्न भोजन कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट होते शाळा भरतीचे प्रमाण वाढवणे, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारणे, शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे तसेच बालकांच्या पोषण स्तरामध्ये सुधारणा करणे. म्हणजेच याचा हेतू होता देशातील, विशेषत: ...