Posts

रोजगार निर्मिती

Image
रोजगार निर्मिती ८,९ जानेवारी २०१९च्या सार्वत्रिक संपाचा मुख्य मुद्दा हेमलता - अध्यक्ष, सिटू   ‘ माझा रोजगार कुठे आहे ?’ हा प्रश्न आज संपूर्ण देशातील लाखो युवक युवतींच्या मनाला भेडसावतो आहे. २०१४ मध्ये युवकांना आकर्षित करून घेण्यासाठी, त्यांची मते मिळविण्यासाठी निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी एका आश्वासनावर ते सरकारकडून ठोस उत्तर मागत आहेत. पण मोदी सरकार मात्र बहिरे असल्याचे नाटक करत आहे.   आज जेव्हा भाजप सरकार आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे तेव्हा रोजगाराची नेमकी स्थिती काय आहे ? २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकींआधी भाजपने वचन दिले होते की त्यांना सत्ता मिळवण्याइतकी मते मिळाली तर ते दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करतील. सत्तेमध्ये स्थानापन्न झाल्यावर मोदी सरकारने ‘ मेक इन इंडिया ’, ‘ स्किल् इंडिया ’, ‘ स्टार्ट अप इंडिया ’, ‘ डिजिटल इंडिया ’ प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (पीएमआरपीवाय) अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरवात करून असा भ्रम निर्माण केला की यातून रोजगार निर्मिती होणार आहे. नोकरीसाठी भटकंती आणि गुणवत्तापूर्ण नोकऱ्या नदारद...

८ आणि ९ जानेवारी २०१९ - दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संप

Image
८ आणि ९ जानेवारी २०१९ - दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संप २८ सप्टेंबर २०१८ रोजी मावलंकर सभागृह, नवी दिल्ली येथे झालेल्या कामगारांच्या राष्ट्रीय संमेलनाची हाक घोषणापत्र ८ ऑगस्ट २०१७ रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कामगारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे निर्णय केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र फेडरेशन्स आणि संघटना पुढच्या टप्प्यात घेऊन गेल्या आहेत. ३ महिन्यांच्या देशव्यापी व्यापक व सखोल मोहिमेनंतरच्या ९, १० व ११ नोव्हेंबर २०१७ च्या महापडावाचे यशस्वी आयोजन हा सरकारकडून कष्टकरी जनता आणि त्यांच्या कामगार संघटनांवर होणारे हल्ले, कामगारांनी मोठ्या कष्टाने लढून मिळवलेल्या कामगार अधिकारांवरील हल्ले, कामगार कायद्यांचे कामगार विरोधी व मालक धार्जिणे संहितीकरण आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांचे तसेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या सनदींचे उल्लंघन ह्या सर्वांचा प्रतिरोध करण्यासाठी केलेल्या लढ्यातील एक मैलाचा दगड होता. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखणे, नवीन सन्माननीय रोजगाराची निर्मिती, कमीत कमी १८००० रुपये किमान वेतन आणि सर्वांना किमान ६००० रुपये पेन्शन, सार्वजनिक उद्योगांच्...

स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘सामूहिक जागरण’

Image
मजदूर-किसान संघर्ष रॅली सीआयटीयु-अखिल भारतीय किसान सभा-अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ – चलो लोकसभा १४ ऑगस्ट २०१८ - स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘ सामूहिक जागरण ’ आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून आता सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपण भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिशांशी शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत निकराचा लढा दिला. तो कुणा व्यक्ती किंवा पक्षाने एकट्याने दिलेला लढा नव्हता. ह्या लढ्यामध्ये अनेक ठिकाणी देशातील कष्टकरी जनता, कामगार वर्ग, शेतकरी, आदिवासी हे सर्व आघाडीवर होते. आर्थिक शोषण आणि सरंजामी दमन याच्या विरोधात लढत असतानाच त्यांनी असे शोषण आणि दमन लादणाऱ्या वसाहतवादी सत्तेविरोधात देखील लढा दिला. आपले वाडवडील जेव्हा अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध लढत होते, तेव्हा देशाच्या, आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडा, पंतवंडांच्या भवितव्याबद्दल त्यांनी काही स्वप्ने उराशी बाळगली होती. शेकडो, हजारो कामगार, युवा, विद्यार्थी, महिला, जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी सर्वस्वाचा त्या...