समान कामाला समान वेतन तत्वाची अंमलबजावणी करा
भारतीय ट्रेड
युनियन केंद्र (CITU), भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबरला दिलेल्या ‘समान कामाला समान वेतन’ तत्वाचा पुनरुच्चार करणाऱ्या निकालाचे स्वागत करत आहे.
समान व एकाच
प्रकारच्या कामाला समान वेतन द्यायला नकार देण्याचा प्रश्न कामगार संघटनांनी
बऱ्याच काळापासून उचलला आहे. समान वेतन कायदा अस्तित्वात असून देखील आजही अनेक
क्षेत्रांमध्ये समान काम करणाऱ्या स्त्री, पुरुषांच्या वेतनांमधील फरक नष्ट
करण्यात यश आलेले नाही. त्याचप्रमाणे नियमित कामगार आणि तात्पुरत्या,
रोजंदारीवरच्या आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनांमधल्या प्रचंड फरकाचा प्रश्नही
तसाच चालू आहे.
केंद्रातील
वेगवेगळ्या सरकारांच्या काळात कामगार संघटनांनी हा प्रश्न उचलला आहे. २००९ आणि
२०१० मध्ये देशातील सर्वोच्च त्रीपक्षीय संस्था असलेल्या भारतीय श्रम परिषदेने कंत्राटी
कामगार (निर्मूलन आणि नियमितीकरण) कायद्यात समान व एकाच प्रकारच्या कामाला समान
वेतन देण्याची दुरुस्ती करण्याच्या मुद्द्यावर समारोप केला. ह्याचा ४६व्या भारतीय
श्रम परिषदेनेही पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
पण सरकारने
त्यावर काहीच कृती केलेली नाही. ज्या मागण्यांवर देशातील कामगार संघटना लढा करत
आहेत आणि देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारत आहेत, त्यातलीच ही एक मागणी राहिलेली
आहे.
सीआयटीयु मागणी
करीत आहे की, समान कामाला समान वेतन हा प्रत्येक कामगाराचा स्पष्ट आणि नि:संदिग्ध अधिकार असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तरी
आता भारत सरकार आणि राज्य सरकारांनी ह्या तत्वाचे निश्चितपणे पालन करण्याची हमी
घ्यावी. आता त्याच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब लावता कामा नये ही सीआयटीयुची
मागणी आहे.
समान
कामाला समान वेतन हा प्रत्येक कामगाराचा स्पष्ट आणि नि:संदिग्ध अधिकार असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या
निर्देशानंतर तरी, भारत सरकार व राज्य सरकारांनी या तत्वाचे पालन करावे अशी
सीआयटीयु मागणी करीत आहे. आता त्याच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होता कामा नये
अशी सीआयटीयुची मागणी आहे.
कामगाराच्या
ह्या अधिकाराचे पालन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही तत्वे अधोरेखित केली
आहेत. हा अधिकार नाकारण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाने प्रतिपादित केलेल्या तत्वांचे उल्लंघन
केले जाऊ नये याचीही हमी भारत सरकारने घेतली पाहिजे.
सर्व क्षेत्रांमध्ये ह्या अधिकाराची अंमलबजावणी करवून घेण्यासाठी
आवश्यक तो लढा देण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन सीआयटीयु सर्व कामगार संघटनांना व
कामगारांना करत आहे.

Comments
Post a Comment